महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची जमीन परत; अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

मुंबई – कल्याणमधील गोळवली परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर व प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे असलेली, पण एका बिल्डरकडून बळकावलेली जमीन अखेर मूळ वारसांना परत करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी सशक्त बियाणे कायदा आणणार – कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, बियाणे संदर्भात शेतकरी वर्गाला अपेक्षित असलेल्या तरतुदींचा समावेश असलेला सशक्त कायदा सरकार करणार असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात ‘बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) अशासकीय विधेयक’ मांडले. त्यांनी लक्ष वेधले की, राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विषय अतिशय गंभीर आहे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव उत्साही वातावरणात संपन्न; २० हजारांहून अधिक नामधारकांची उपस्थिती

By: योगेश त्रिवेदी मुंबई : जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आणि सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. या औचित्याने, मिशनने १० जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी ‘प्रल्हाद पै अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा केला. मुंबईसह महाराष्ट्र व परदेशातून आलेल्या हजारो नामधारकांच्या उपस्थितीने सोहळा भावपूर्ण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध – संभ्रम दूर करून नव्याने विधेयक आणा : आ. अभिजित वंजारी

मुंबई – जनसुरक्षा विधेयकाबाबत जनतेत संभ्रम आहे, तो दूर करूनच नव्याने विधेयक आणावे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य आ. अभिजित वंजारी यांनी आज केली. १२ हजारांहून अधिक व्यक्ती व संघटनांनी सुचना व आक्षेप नोंदवले असून जनसुनावणी झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. विधान परिषदेत वंजारी म्हणाले, नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकार म्हणते, पण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हक्कभंगाच्या नावाखाली दडपशाहीचा प्रयत्न; सुषमा अंधारेंची प्रसाद लाड यांच्या खोटारडेपणावर कठोर टोलेबाजी

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद सदस्य आणि हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यावर सभागृहाच्या पटलावर खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर जबरदस्त पलटवार केला आहे. हक्कभंगाची नोटीस ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत अंधारे यांनी एकाच वेळी लाड यांच्या […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र २०४७’ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आवाहन

मुंबई – ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले. राज्य सरकारने ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली असून, यामध्ये दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन उद्दिष्टांवर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यावर Rs 9.32 लाख कोटींचं कर्ज; सरकार आर्थिक जबाबदारीपासून पळतेय – अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

मुंबई – राज्यावर ₹9.32 लाख कोटींचं कर्ज असून, सरकारने 57 हजार कोटींच्या वाढीव पुरवणी मागण्या सादर करत आर्थिक स्थिती अधिकच ढासळवली आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केला. दानवे म्हणाले की, सरकारकडून कृषी, वैद्यकीय, सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे. कृषी खात्याला अत्यल्प निधी देण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात सार्वजनिक विद्यापीठे आणि अशासकीय महाविद्यालयांतील पदभरतीस वेग; अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या निर्णयामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीसही मान्यता देण्यात आली आहे. विधानभवनात आयोजित उच्च व तंत्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविश्वाचा वटवृक्ष – पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिन राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापन दिनाचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या सोहळ्याला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी अनुसूचित जातीतील युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर शैक्षणिक व […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी शाळा बंद, शिक्षक आंदोलनात; मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबई – राज्यातील ५ हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत आणि अनेक मराठी शाळा बंद आहेत, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. सुळे म्हणाल्या की, १० ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांनी ५००० विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची घोषणा […]