महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ७६७ शेतकरी आत्महत्या : स्थगन प्रस्ताव नाकारल्यावर विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा, विरोधकांचा सभात्याग

मुंबई – राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातील प्राधान्यक्रम यावर कठोर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या स्थगन प्रस्तावाला मंजुरी न दिल्यामुळे त्यांनी तीव्र निषेध नोंदवत विरोधी सदस्यांसह सभात्याग […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वीज पडण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी नवे ॲप विकसित करणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, यासाठी ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ या ॲप्सद्वारे पूर्वसूचना दिली जाते. मात्र नागरिकांपर्यंत ही माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचावी यासाठी नवीन ॲप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आमदार समीर कुणावार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बबनराव लोणीकर यांच्या स्पष्टीकरणावरून विधानसभेत गदारोळ; सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब

मुंबई – शेतकऱ्यांबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर चर्चेत आलेले माजी मंत्री व भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या बोलण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. मंत्री शंभुराज देसाई यांच्या विधेयक सादरीकरणानंतर बबनराव लोणीकर उभे राहिले आणि शेतकऱ्यांबाबत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गिरगाव चौपाटीला ‘राष्ट्रीय स्मारक’ दर्जा देऊन ‘स्वराजभूमी’ नामकरण करावे – सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे गिरगाव चौपाटीवरील समाधीस्थळ ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करून त्याचे ‘स्वराजभूमी’ असे नामकरण करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आ. प्रभू म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या अंत्यसंस्कारासाठी गिरगाव चौपाटीचे मैदान निवडण्यात आले होते, आणि त्याच ठिकाणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मालाड नागरी निवारा वसाहतीतील मूल्यांकन रक्कम १% करण्याचा विचार; नियमावली पावसाळी अधिवेशनाअखेर तयार होणार – महसूलमंत्री बावनकुळे यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई – मालाड पूर्वेतील शंभर टक्के मराठी भाषिक नागरी निवारा वसाहतीच्या 113 सहकारी गृहनिर्माण संस्थांतील मूल्यांकन रक्कम 10 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात, तसेच GR (शासन निर्णय) सुटसुटीत करणे, अभय योजना लागू करणे आणि संबंधित इतर बाबींविषयी नियमावली तयार करण्याचे काम चालू असून, ती पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित होणार – मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – मुंबई महानगरपालिका हद्दीतील मनपा कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये अनुज्ञा व अनुमती तत्वावर दिलेल्या सदनिकांबाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुंबईतील सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. चेंबूर व घाटला येथील आमदार तुकाराम काते यांनी विधानसभा नियम 105 अंतर्गत ही लक्षवेधी सूचना मांडली. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ऑनलाइन अन्न वितरणात फसवणूक आणि आरोग्याला धोका : आ. संदीप जोशी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष मोहिमेची घोषणा

मुंबई – स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे अन्नपदार्थ वितरित करताना ग्राहकांची फसवणूक, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, चुकीचे वजन आणि ऑर्डरमधील वस्तूंमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मात्र, याविरोधात कार्यरत असणारी सक्षम सरकारी यंत्रणा नाही, असा मुद्दा विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. आ. जोशी यांनी अन्न […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पत्रकार संघाच्या सेवेत समर्पित दशक; स्नेहल मसूरकर यांचा गौरव

By योगेश त्रिवेदी मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कर्मचारी सौ. स्नेहल मसूरकर या १० वर्षांच्या सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्या. या निमित्ताने पत्रकार संघातर्फे आयोजित कौटुंबिक निरोप समारंभात विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि पत्रकार संघाच्या वैभवशाली वाटचालीचे स्मरण करून दिले. स्नेहल मसूरकर यांनी आपल्या सेवाकाळात संघप्रती जबाबदारीनं कार्य करत निष्ठेने सेवा […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकास प्रकल्पांचा आढावा; ‘एक पैसाही वाया जाऊ देऊ नका’ – अजित पवार

मुंबई – पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतील एक पैसाही परत जाणार नाही, याची जबाबदारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

संजय मुळे राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित

By: योगेश त्रिवेदी मुंबई : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे यांना राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे, मानवतावादी चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर […]