महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने रोहिणी खडसे गरजल्या!

मुंबई : कधीकाळी नाशिक जिल्ह्याच्या शिवसेनेच्या राजकारणात उध्दव ठाकरे यांचे खास विश्वासू मानले जाणारे वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये त्यांच्या समर्थकांसह प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे चांगल्याच संतापल्या. भाजपवर तोंडसुख घेताना त्या गरजल्या की, ‘नितीश कुमारांपेक्षा मोठे पलटूराम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार जाहीर; आशाताई भोसले यांच्या सन्मानार्थ १२ पुरस्कार प्रदान होणार

मुंबई – महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेल्या रेडिओ आणि आकाशवाणी या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, निवेदक आणि तंत्रज्ञ घडले. या योगदानाच्या गौरवासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्रभूषण’ आशाताई भोसले यांच्या सन्मानार्थ ‘महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहास दर्शनाचा अनुभव

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे राष्ट्रवादी तत्त्वज्ञान यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे संग्रहालय येत्या काळात जनतेसाठी खूले केले जाईल, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीचे महासचिव कर्नल मोहन कात्तीकर (सेवानिवृत्त) यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान वारशाचे देश-विदेशातील नागरिकांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दाऊदलाही भाजपात प्रवेश देणार का?: काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

मुंबई: “भाजपाला आता इतकी नैतिक अधोगती आली आहे की उद्या कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेतील काय?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, पण सध्या या पक्षात कोणत्याही पातळीवर कोणीही प्रवेश करू शकतो. ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मंत्रीपद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत; २१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्कारांचे वितरण

मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा २१ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येतात. राज्यातील तरुणांनी या योजनांचा स्वयंस्फूर्तीने लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याण पश्चिमेतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पुन्हा मार्गी लागण्याच्या दिशेने; माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांना नागरिकांचा प्रतिसाद

कल्याण: कल्याण पश्चिममधील अनेक वर्षांपासून ठप्प पडलेले पुनर्विकास प्रकल्प पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून, या प्रकल्पांतील शेकडो रहिवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शनिवारी दिवसभर पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकल्पांच्या रहिवाशांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका लागला, ज्यामध्ये पवार यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. चिकणघर येथील बैठकीने निर्माण केला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते, घरात बसणाऱ्यांच्या नाही!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई: “राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातील सरकार आणलं. त्यानंतर काही लोकांनी केवळ आरोप आणि टीकाच केली, पण आम्ही कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच जनता आज काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, घरात बसणाऱ्यांच्या नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. ठाकरे गटाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफी, पीकविमा, जनसुरक्षा कायदा रद्द आणि नवा रेल्वे मार्ग – भाकपाच्या जिल्हा अधिवेशनात ठराव; ९ जुलैला जिल्हाभर सत्याग्रह

परभणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५व्या जिल्हा अधिवेशनात शेतकऱ्यांना सर्वंकष कर्जमाफी लागू करावी, एक रुपयात पीकविमा योजना लागू करावी, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, गायरान आणि देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, आणि मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी हा नवीन रेल्वेमार्ग तत्काळ सुरू करावा अशा ठरावांचे एकमताने अनुमोदन करण्यात आले. या मागण्यांच्या समर्थनार्थ दि. ९ जुलै रोजी भाजप सरकारच्या शेतकरी-विरोधी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असल्यास संबंधितांवर कारवाई – भाजपचे रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

मुंबई: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे मुसळधार पावसामुळे पादचारी पूल वाहून जाण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत आणि जखमींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. मात्र या गंभीर घटनेचा राजकीय वापर करत खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका उथळ […]