हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असल्यास संबंधितांवर कारवाई – भाजपचे रविंद्र चव्हाण यांची ग्वाही
मुंबई: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे मुसळधार पावसामुळे पादचारी पूल वाहून जाण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत आणि जखमींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. मात्र या गंभीर घटनेचा राजकीय वापर करत खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका उथळ […]