महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde : मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे; शिवसेनेच्या वतीने मदतीचे ट्रक रवाना

मुंबई: राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शिंदे म्हणाले, “मी स्वतः धाराशिव जिल्ह्याला भेट देऊन भूम, परांडा आणि कळंब तालुक्यांची पाहणी करणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नांदेडच्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना Rs ५५३ कोटींचा दिलासा!

मुंबई:ऑगस्ट २०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे व जमीनिचे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ₹५५३.८४ कोटींच्या मदत पॅकेजला अखेर शासनमान्यता देण्यात आली आहे. मंत्री अनिल सावें यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ७,९२,३४४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, पिकांचे व जमीनिचे एकूण ₹५७४.२८ कोटींचे नुकसान झाल्याचा पंचनामा जिल्हाधिकाऱ्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक पवार

मुंबई: सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान व सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन यंदा वसई येथे नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात होणार असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीच्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी सायमन मार्टिन यांच्या संयोजनाखाली हे संमेलन होणार आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

”जीएसटी-२ हे धोरण नवीन पिढीला बळ देणारे” — खा. सुनिल तटकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णयामुळे जीएसटी-२ हे धोरण देशाच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी तसेच सामान्य ग्राहकांच्या हितासाठी आणि नवीन पिढीला बळ देणारे ठरणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे त्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जुलै–ऑगस्टमधील आपदग्रस्त शेतकऱ्यांना Rs १,३३९ कोटींच्या मदत पॅकेजला मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५० हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी एकूण ₹१,३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीस शासनमान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई: राज्यातील लोकनाट्य व तमाशा या नावांचा संगीतबारी कला केंद्रांसाठी वापर होऊ नये, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापन केलेल्या समितीकडे पाठविण्यात येईल. तसेच या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसांत द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी दिले. तमाशा कलावंतांच्या विविध प्रश्नांसंदर्भात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयात “आमदार कक्ष” स्थापन करा – आमदार विलास तरे यांची मागणी

मुंबई/पालघर: मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र “आमदार कक्ष” स्थापन करून संगणक, प्रिंटर व इतर आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार तरे म्हणाले की, राज्यात २८८ आमदार व ७८ विधानपरिषद सदस्य अशा एकूण ३६६ लोकप्रतिनिधींना विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात यावे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पॉड टॅक्सी’ नागरिकांच्या सेवेत आणा – मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसोबतच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची सोय करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पॉड टॅक्सी’ संदर्भात आयोजित बैठकीत दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ अखेरपर्यंत खुले होतील – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: ठाण्यातील मेट्रो ४ (वडाळा–कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या मेट्रो ११ शी जोडल्या जाणार असून, एकूण ५८ किमीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका पुढील वर्षअखेर प्रवाशांसाठी खुली होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ४ व ४ अ च्या प्राधान्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MIDC land scam : अंबरनाथमध्ये औद्योगिक भूखंडाचा घोटाळा : प्यारेलाल टेक्सटाईल्सची नफेखोरी; भूखंडाचे केले ६३ तुकडे, MIDC सुस्त 

X: @vivekbhavsar मुंबई: अंबरनाथसारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या औद्योगिक भूखंडावर वस्त्रोद्योग उभारायचा होता, तो भूखंड आज छोट्या-छोट्या भागांत विभागून विक्रीसाठी तयार केला जातो आहे. प्यारेलाल टेक्सटाईल्स लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सर्व नियम, अटी व शर्ती धाब्यावर बसवून भूखंडाचे तुकडे केले असून, करोडो रुपयांची थकबाकी […]