महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार; क्यूआर कोडचा पहिल्यांदाच वापर

By एस. व्ही.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राज्यातील नगरपालिका निवडणुका ३ डिसेंबर रोजी पार पडून निकाल लागल्यानंतर सगळ्यांचा लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागणार आहे. विविध पक्षांतील फूट आणि नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

अजून महापालिका निवडणूक जाहीर झालेली नसली तरी जानेवारी २०२६ मध्ये या निवडणुका पार पडणार असल्याचे आतापासूनच या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘हायटेक’ प्रचाराच्या झेप घेतली आहे. पक्षाने पहिल्यांदाच क्यूआर कोडच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्याची मोहीम सुरू केली आहे.

आवाज मुंबईकरांचा – संकल्प भाजपचा” उपक्रम

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या संकल्पनेतून “भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून भाजप कार्यकर्ते हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवत असून, घराघरात पत्रके वाटत आहेत.

या पत्रकात लिहिले आहे – “मुंबई वाचवायची असेल, तर मुंबई कशी असावी याचा विचार प्रत्येक मतदाराने करावा. ‘आवाज मुंबईकरांचा – संकल्प भाजपचा’ या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा.”

पत्रकात दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मतदारांना एक फॉर्म भरता येतो, ज्यात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आपला अभिप्राय नोंदवता येतो.

क्यूआर कोडमधील माहिती काय विचारते?

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदारांना खालील माहिती भरावी लागते:
• वैयक्तिक तपशील (विधानसभा क्षेत्र, वय, मोबाईल क्रमांक)
• मुंबईला भेडसावणाऱ्या ५ प्रमुख समस्या — रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, स्वच्छता, मोकळ्या जागा, पर्यावरण, पार्किंग, अतिक्रमण इत्यादींपैकी निवड
• नगरसेवकांकडून असलेल्या अपेक्षा
• मागील दहा वर्षांत आवडलेली विकासकामे
• पालिकेच्या कामकाजाबद्दल समाधानाचा स्तर
• मतदान करताना पक्षाला की व्यक्तीला प्राधान्य द्याल याविषयी मत

तसेच, “आपल्या मनातील मुंबई कशी असावी?” यावर स्वतःची संकल्पना मांडण्याची संधीही या फॉर्ममध्ये दिली आहे.

घराघरात पोहोचणारा डिजिटल संवाद

वरळी विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की, “आम्ही प्रत्येक इमारती आणि चाळीत जाऊन पत्रके वाटत आहोत. क्यूआर कोड स्कॅन करण्यास मदत करून नागरिकांचा अभिप्राय त्यांच्या मोबाईलवरूनच भरून घेतो. हा उपक्रम मागील आठवड्याभरापासून सुरू आहे.”

क्यूआर कोडच्या माध्यमातून जमा झालेली सर्व माहिती संकलित करून तिचे विश्लेषण भाजपाच्या वचननाम्यात वापरण्यात येईल, असे पक्ष कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचा हा उपक्रम केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, मतदारांचा थेट सहभाग मिळवण्याचा एक हायटेक प्रयत्न आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून जमणारा डेटा महापालिका निवडणुकीत पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी उपयोगात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात