मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यातील जागा वाटपाचा वाद मिटलेला नव्हता . महायुतीतील (Mahayuti) नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती मात्र यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जागेचा मुद्दा रखडलेला होता .दरम्यान, या जागेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरला असून या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु येत्या 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .
या मतदारसंघात याआधी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार यावर चांगलीच चर्चा सुरू होती. या नंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवनेकडून संदीपान भुमरे यांना तिकीट दिल जाणार आहे .त्यामुळे आता या मतदारसंघात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पक्की झाली आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. वंचितच्या या उमेदवाराचा चंद्रकांत खैरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजप कडून देखील या जागेवर आपला दावा सांगितला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली होती . या बैठकीतच संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होत . त्यांच्या या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनी देखील तयारी चालू केली. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .