ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पुण्यातील कुख्यात गुंड; खून, दरोड्याच्या आरोपीसह मुख्यमंत्र्यांचा फोटो, संजय राऊतांचं ट्विट करत हल्लाबोल

पुणे: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने शुभेच्छा दिल्याचा फोटो सोमवारी समोर आल्याने खळबळ उडाली होती. आधीच शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करणारा गणपत गायकवाड याने एकनाथ शिंदेंवर गुंडशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीची भेट झाली, याचाही एक फोटो समोर आला आहे. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. संजय राऊतांनी तो फोटो ट्विट करीत महाराष्ट्रात गुंडा राज म्हणत हल्ला केला आहे.

संजय राऊतांनी ट्विट केलं, महाराष्ट्रात गुंडा राज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने, असा टोला राऊतांनी सरकारवर लगावला आहे.

कोण आहे निलेश घायवळ?
पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळख असलेला निलेश घायवळ याच्याविरोधात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न असेही गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. २०२१ मध्ये पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात त्याला स्थानबद्ध केलं होतं.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात