महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? – काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

एकीकडे पंतप्रधान  नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा असे  म्हणतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो, अशी टीका करत आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सांगणार? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

केंद्राच्या किसान संपदा योजनेत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या, आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी लाभार्थी ठरल्या आहेत. यावरून सावंत यांनी भाजपवर आज सडकून टीकाही केली.

पंतप्रधान मोदी सातत्याने विरोधी पक्षांच्या घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत असतात. पण त्यांना स्वतःच्या पक्षातील घराणेशाही आणि भ्रष्टाचार दिसत नाही. किसान संपदा योजनेची लाभार्थी भाजपा नेते विजयकुमार गावित यांची मुलगी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी आहेत. हा आर्थिक परिवारवाद मोदींना दिसत नाही का? शेतकरी मजूबत करण्यासाठीच्या योजनेतून भाजपचे नेतेच मजबूत होत आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला.

किसान संपदा योजनेतून कंपन्याना अनुदान दिले जाते. पण या योजनेतून मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी आणि आसामचे मुख्यमंत्री यांची पत्नी यांना प्रत्येकी १० कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. हा एक प्रकारचा परिवार वादच आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेतून उद्योजक निर्माण केले पाहिजेत, अशी अपेक्षा असताना इथे मात्र भाजप नेत्यांचीच घरभरणी होत आहे, याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. पण त्यांच्याच पक्षातील लोक भरपूर खातात. त्याकडे मोदींचे लक्ष का जात नाही? शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ होऊन त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकरी दिवसेंदिवस संकटातच सापडत आहे. शेतकरी उपाशी आणि भाजप नेत्यांचे नातेवाईक मात्र तुपाशी असा हा प्रकार असून शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजप नेत्यांचे नातेवाईकच लाभ उठवत आहेत, असाही आरोप सावंत यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात