महाराष्ट्र

धोकेबाज भाजपाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका – काँग्रेस

देशाचे पंतप्रधान व भाजपाच्या खोटारडेपणाची काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांकडून शनिवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांगलीच चिरफाड करण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुढच्या आठवड्यात किमान काँग्रेस पक्ष तरी आक्रमकच प्रचार करुन खास करून भाजपचे राज्यातील नेते व अन्य नेत्यांची झोप उडवतील हे मात्र या निमित्ताने स्पष्ट झाले.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदी दिग्गज नेत्यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहितीही दिली.

यावेळी बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी भाजपाचा खोटेपणा उघड करताना सांगितले की, सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला. पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जूनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्र.की. ३० रु., गहू ४० रु. कि. तर गाईच्या दूधाला प्रति लिटर ४५ तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. तसेच १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे सुख्खू यांनी यावेळी सांगितले.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी ६ गॅरंटी जाहिर केल्या होत्या त्या काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली, याचा फायदा २२ लाख शेतकऱ्यांना झाला असून यासाठी बळीराजाला १८ कोटी रुपये वितरीत केले. केवळ १० महिन्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास सुरु केला असून आतापर्यंत वाहतूक महामंडळाला ३४०० कोटी रुपये दिले आहेत. इतकेच नव्हे तर ५९ लाख कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले जात असून गृहज्योती योजनेअंतर्गत ५० लाख कुटुंबांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे. महालक्ष्मी योजनेसाठी दरवर्षी ४ हजार कोटी असे पाच वर्षांसाठी २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून त्याचीही तरतूद केली आहे. आणि आता आमचे नेते राहूल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु केली जाणार आहे, असेही रेड्डी यांनी यावेळी ठामपणे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात कर्जमाफी दिली नाही असे ट्विट केले होते. पण मी त्यांना कर्जमाफीचा अहवाल पाठवल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. कारण आता भाजपाकडे सांगण्यासारखे काहीही नाही म्हणून ते काँग्रेस विरोधात जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्र म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आठवतात पण या महान शक्तीशाली महाराष्ट्राला भाजपच्या शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवलेले असून आता पुन्हा हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा भाजपाच्या हातात देऊ नका, असे खुले आवाहनही रेड्डी यांनी केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की आम्ही निवडणुकीच्या वेळी कर्नाटकात जर आमचे सरकार आले तरं ६ गॅरंटी देणारं. मात्र काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणीही आम्ही सुरु केली. इतकेच नव्हे तर कर्नाटकातील १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत असून ४ कोटी ८ लाख लोकांना ‘अन्नभाग्या’ योजनेअंतर्गत १० किलो मोफत तांदूळ दिले जात आहेत. ‘शक्ती’ योजनेतून आतापर्यंत ३२० कोटी महिलांनी मोफत बस प्रवास केला असून ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत. तरं सरकार स्थापन झाल्यानंतर ६० दिवसातच या सर्व गॅरंटी लागू केल्या असून यासाठी ५२ हजार कोटी रुपयांची तरतूदही केलेली आहे. कारण कर्नाटकाचे बजेट ३ लाख ६५ हजार कोटींचे असून देशातील अनेक भाजप शासित राज्यांपेक्षा कर्नाटकची अर्थव्यवस्था उत्तम आहे. त्यातही भाजपाच्या नेत्यांना विशेष विमान व बससेची व्यवस्था करतो त्यांनी कर्नाटकात येऊन ३३ जिल्ह्यांचा प्रवास करून जनतेला या गॅरंटीबद्दल विचारून खात्री करुन घ्यावी, असे खुले आव्हानही यावेळी शिवकुमार यांनी दिले.

Avatar

Meenal Gangurde

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात