महाराष्ट्र ताज्या बातम्या

ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्जमाफी द्या – डॉ. अजित नवले

बीड : “तुटपुंज्या मदतीने उध्वस्त शेतकऱ्यांची मलमपट्टी नको, सरकारने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव व राज्य सरचिटणीस, शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत केली.

किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजय बुरांडे यांच्यासह शेतकरी व कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टी, ढगफुटीसदृश्य पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. नवले म्हणाले की, खरीप हंगाम 2025 च्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे अनेक प्रकल्प भरले, तर सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे 7 लाख हेक्टर शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर भूगोल बदलला असून शेतीऐवजी नदीपात्र तयार झाले आहे.

सरकार शेतकरीविरोधी – नवले यांचा आरोप

“मराठवाड्यात नांदेड व बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून शेतकरी, शेतमजूर, पशुधन यांची भीषण अवस्था झाली आहे. मात्र केंद्र आणि राज्यातील कार्पोरेट धार्जिणे सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील आहे,” असा आरोप डॉ. नवले यांनी केला.

मागण्यांची यादी

डॉ. नवले यांनी सरकारकडे पुढील मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली –
• संपूर्ण कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करणे.
• प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पेरणी न होणे, प्रतिकूल हवामान, स्थानिक आपत्ती, पिक कापणी पश्चात आपत्ती संरक्षण पुन्हा लागू करणे.
• कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पिक विमा योजनेत सुधारणा करणे.
• अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे, वीज रोहित्र व खांबांची तात्काळ दुरुस्ती.
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीची पूर्ण माफी.
• शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे आर्थिक मदत.
• खचलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1.5 लाख रुपये मदत.
• मृत पशुधनासाठी बाजारभावाप्रमाणे मदत.
• भूमिहीन शेतमजुरांना 30 हजार रुपये श्रम नुकसान भरपाई.

३० सप्टेंबरला आंदोलन

या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर हजारो शेतकरी, शेतमजूर आणि कामगार मोठे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती डॉ. नवले यांनी दिली.

पत्रकार परिषदेत किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हा अध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, सीटूचे डॉ. अशोक थोरात, शेतमजूर युनियनचे बळीराम भुंबे, एसएफआयचे राज्य अध्यक्ष रोहिदास जाधव आदी उपस्थित होते. परिषद यशस्वी करण्यासाठी माकप शहर सचिव सुहास जायभाये, आबा राठोड, संतोष जाधव, सिद्राम सोळंके, बंडू गरड आदींनी परिश्रम घेतले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात