ताज्या बातम्या महाराष्ट्र

Neelam Gorhe: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यासदौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली.

या भेटीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या कार्यपद्धतीबरोबरच Commonwealth Parliamentary Association (CPA) यांच्या बार्बाडोस येथे झालेल्या परिषदेत चर्चिलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, लंडनमधील महाराष्ट्र मंडळ लंडन यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी विशेष सहकार्य करण्याची विनंती त्यांच्या समवेत असलेल्या महाराष्ट्र मंडळ, लंडनचे वैभव खांडगे व वृषाल खांडके यांनी उच्चायुक्तांकडे केली.

या भेटीदरम्यान भारतीय दूतावासातील सुरक्षा जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी किरण भोसले (मुंबई पोलीस) यांच्याशीही संवाद झाला. मध्यंतरी उद्भवलेल्या घटनांदरम्यान तिरंगा ध्वजाचे प्रभावी संरक्षण करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काळातील त्यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचेही लंडनमध्ये आगमन झाले असून, पुढील कार्यक्रम तसेच काही प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. ब्रिटनमधील काही मुद्द्यांवर पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात