महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार रुपयांच्या मदतीवर लवकर निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : योगेश कदम

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर उचित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आणि नि:संदिग्ध उत्तर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री Yogesh Kadam यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.

भाजपचे ज्येष्ठ सदस्य Sudhir Mungantiwar यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याच्या मागणीसंदर्भात विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे लक्षवेधी सूचना मांडली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी २५ डिसेंबर २०२५ पासून अंमलबजावणीचे आदेश दिले असतानाही कार्यवाही का होत नाही? अन्न व नागरी पुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

नुकसानग्रस्त धान उत्पादकांचा अवमान करू नका. सर्व शेतकऱ्यांमध्ये धान उत्पादक सर्वाधिक गरीब असून एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च येतो; त्यामुळे बोनस मिळणे आवश्यक आहे, असे सांगत दोन दिवसांत शासन निर्णय (GR) काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीला Vijay Wadettiwar, Dhananjay Munde, Bhaskar Jadhav आणि Nitin Raut यांनी जोरदार समर्थन दिले.

भास्कर जाधव यांनी कोकणातील भात उत्पादकांना वगळू नये, अशी मागणी केली. तर धनंजय मुंडे यांनी धान उत्पादकांना न्याय देतानाच मराठवाडा व विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही तसाच दिलासा द्यावा, असा आग्रह धरला.

उत्तर देताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, बोनस देण्याच्या विरोधात शासन नाही. मात्र काही ठिकाणी एजंटमार्फत बोगस नोंदणी करून प्रोत्साहनपर रक्कम मिळवल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे सर्वेक्षण आवश्यक आहे. खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरच मदत पोहोचावी, ही शासनाची भूमिका आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यानंतर कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात