नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे पोलिस दल ठरले चमकदार विजेते
नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 14 ते 19 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 36व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलिस दलाने दणदणीत कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि साक्री यांच्यात झालेल्या या स्पर्धेत धुळे पोलिसांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत पदकतालिकेत भक्कम उपस्थिती नोंदवली.
स्पर्धेत धुळे पोलिस दलातील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकं पटकावली. विशेषतः महिला विभागात धुळे महिला पोलिसांनी उपविजेतेपद पटकावत आपली दमदार कामगिरी सिद्ध केली.
धुळे पोलिसांचे पदकवीर–
क्रमांक
खेळाडूचे नाव
पदक
1
जूडो (पुरुष)
प्रथम
2
जूडो (महिला)
प्रथम
3
कुस्ती (महिला)
द्वितीय
4
हॉकी (पुरुष)
द्वितीय
5
बास्केटबॉल (पुरुष)
द्वितीय
6
बॅडमिंटन (महिला)
द्वितीय
7
अॅथलेटिक्स (महिला)
द्वितीय
8
तायक्वांदो
द्वितीय
9
बॅडमिंटन (पुरुष)
तृतीय
10
कुस्ती (पुरुष)
या सर्व कामगिरीमुळे धुळे पोलिस दलाने स्पर्धेतील आपली भक्कम उपस्थिती अधोरेखित केली.
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्रीकांत देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मा. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. गणेश्वर जाधव, तसेच इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलिसांचे खेळाडू सातत्याने सराव करून स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करू शकले.
पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी या सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

