महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवाळी अंक स्पर्धा: “हंस” ठरला सर्वोत्कृष्ट

एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळवला मान

मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा जाहीर झाली असून, “हंस” दिवाळी अंकाने सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा मान पटकावला आहे. या पुरस्कारासोबत एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

पारितोषिक वितरण सोहळा उद्या, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या वेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जातील. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानी असतील.

या स्पर्धेत विजेत्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन दिवाळी अंकांच्या परंपरेला प्रोत्साहन दिले जाते. सोहळ्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सेक्रेटरी परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी दिली.

राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल :
• सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक (प्रथम पारितोषिक – १ लाख रुपये व सन्मानचिन्ह): हंस
• द्वितीय पारितोषिक: अंतरीचे प्रतिबिंब
• तृतीय पारितोषिक: अक्षर
• लक्षवेधी उत्कृष्ट अंक: कालनिर्णय दिवाळी अंक
• सर्वोत्कृष्ट विशेषांक: नवभारत, दृश्य कला विशेषांक
• मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक: वयम
• उत्तेजनार्थ: छावा
• सर्वोत्कृष्ट कथा: “सत्याग्रह” – मिलिंद बोकील (दीपावली)
• उत्कृष्ट कविता: आजकाल बायकाही… – लक्ष्मी यादव (पुरुष स्पंदन)
• लक्षवेधी परिसंवाद: असहमतीचा आवाज – ऋतूरंग
• लक्षवेधी मुलाखत: डॉ. सुनील लवटे यांची इंदुमती जोंधळे यांनी घेतलेली मुलाखत (शब्दशिवार)
• सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ: उत्तम अनुवाद
• सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार: प्रभाकर वाईरकर (शब्द रूची)
• सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक: विवेक मेहेत्रे – ‘उद्वेली – ऑल दि बेस्ट २०२४’
• विशेष लेख: “राजकारण की टोळीयुद्ध” – विनय हर्डीकर (आर्याबाग दिवाळी अंक)

रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल :
• सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक: इंद्रधनू (प्रथम पारितोषिक)
• द्वितीय पारितोषिक: आगरी दर्पण
• तृतीय पारितोषिक: शब्दसंवाद
• उत्तेजनार्थ दिवाळी अंक: साहित्य आभा
• उत्कृष्ट कथा: “जिथे कमी तिथे मी” – रेखा नाबर (लोकसेवक)
• उत्कृष्ट कविता: हितवर्धक दिवाळी अंक – कवी गणपत म्हात्रे
• उत्कृष्ट व्यंगचित्रकार: विवेक मेहेत्रे (साहित्य आभा)

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात