मनमाड (ता. नांदगाव, जि. नाशिक) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या ऐतिहासिक वास्तूला “प्रेरणाभूमी”चा दर्जा मिळावा, तसेच १७ नोव्हेंबर हा दिवस “प्रेरणादिन” म्हणून शासनमान्यता मिळावी, या मागणीसाठी मनमाड येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व प्रा. डॉ. अक्षय दिलीपराव आंबेडकर यांनी केले. आंदोलनाला इंदू मिल संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
• या आश्रमाचे भूमिपूजन ९ डिसेंबर १९४५ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते झाले.
• लोकार्पण १७ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांच्याच हस्ते प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडले.
• तेव्हापासून ही वास्तू समाजाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीचे केंद्र राहिली आहे.
आंदोलनात कामगार नेते रमेश मारुती जाधव, प्रतीक कांबळे, विलास रुपवते, अशोक कांबळे यांच्यासह इंदू मिल संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक सहभागी झाले.