महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाहन अपघात टाळण्यासाठी ऑटोमेटिक फिटनेस सेंटर्स – मुख्यमंत्री

X: @therajkaran

नागपूर: राज्यातील वाहन अपघात टाळावेत यासाठी योग्य व फिट वाहनचालक असावेत यासाठी सतरा ठिकाणी ऑटोमेटिक ड्रायव्हिंग टेस्ट (automatic driving test), आणि तेवीस ठिकाणी ऑटोमेटिक फिटनेस सेंटर्स (automatic fitness centres) निर्माण केली जातील, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जानेवारी ते जून २३ या सहा महिन्यांच्या कालावधीत १२१ रस्ते अपघातात (road accident) १३२ मृत्यू होणे, बेकायदेशीर वाहतूक, वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नसणे यामुळे अपघात होतात याकडे लक्ष वेधले होते. याची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली होती.

समृद्धी महामार्गावरही (Samruddhi Mahamarg) अपघात वाढले, याचाही उल्लेख चव्हाण यांनी केला. वाहनचालक परवाना पद्धती कडक करा अशीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना समृद्धी महामार्गावर आतापर्यंत ६० ते ७० लाख वाहने धावली, जे अपघात झाले ते मानवी चूकांमुळे झाले. आता अपघात संख्या कमी झाली अशी माहिती दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात