महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde : संत साहित्य १४ भाषांमध्ये पोहोचवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वा

पंढरपूर – संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांची देणगी दिली. हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाड्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांना संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिंदे म्हणाले, “हे स्थान म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ आहे. या पुरस्कारामुळे कृतार्थ झाल्यासारखे वाटते.” मुख्यमंत्री असताना ‘कॉमन मॅन’साठी काम केले, आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नामदेव महाराजांनी देशभर भागवत धर्माची पताका फडकावली. त्यांनी वारकरी परंपरेतून माणुसकी व भूतदया शिकवली. त्यांच्या कार्यातून समाजसेवा आणि ईश्वरसेवा यांचा संगम दिसतो, असे शिंदे म्हणाले.

राज्यात कोणताही माणूस उपाशी राहू नये, कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशी सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वारकरी परंपरेच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध
वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी अशी विविध पावले उचलण्यात आली आहेत. तिर्थक्षेत्र विकास निधी २ कोटींवरून ५ कोटींवर नेण्यात आला असून गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात