राष्ट्रीय ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहास दर्शनाचा अनुभव

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे राष्ट्रवादी तत्त्वज्ञान यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे संग्रहालय येत्या काळात जनतेसाठी खूले केले जाईल, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीचे महासचिव कर्नल मोहन कात्तीकर (सेवानिवृत्त) यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान वारशाचे देश-विदेशातील नागरिकांना एका अनोख्या अनुभवातून दर्शन घडविणारे हे संग्रहालय आहॆ.

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीमार्फत दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या इमारतीचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 15 सप्टेंबर 2015 ला झाले होते.

जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा समितीचा मानस होता. त्याप्रमाणे वर्ष 2020 पासून यावर काम सुरू आहे. अशी माहिती, श्री कात्तीकर यांनी यावेळी दिली. गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंटचे संचालक संजय दाबके यांच्या मार्गदर्शनात हे जागतिक दर्जाचे संग्रहालय साकारण्यात येत आहे.

या संग्रहालयाचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन घडविण्या बरोबरच त्यांचे राष्ट्रवादी विचार, धर्मनिरपेक्षता, पर्यावरण संरक्षण आणि सर्वसमावेशक कल्याणकारी राज्याच्या दृष्टिकोनाचा प्रसार करणे आहे. विशेषतः उत्तर भारतातील तरुण पिढीला छत्रपती शिवरायांच्या परदेशी आक्रमणकर्त्यां विरुद्धचे योगदान आणि त्यांची रणन‍िती यांची सविस्तर माहिती देण्यासाठी हे संग्रहालय उभारले जात असल्याची माहिती श्री काकत्तीकर यांनी दिली.ही समिती अन्य 9 राज्यांतही विविध लोकोपयोगी उपक्रम चालवत असल्याची माहिती यावेळी दिली.

२७,००० चौरस फूट जागेत पसरलेले हे संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनण्याबरोबरच ऐतिहासिक शिक्षणाचे प्रमुख ठिकाण ठरणार आहे. अत्याधुनिक 13 डी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे संग्रहालय बांधले आहे. ऐतिहासिक प्रदर्शनांचा संगम पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे संग्रहालय उभारले आहे. पाहणाऱ्यांना शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्यक्ष असल्याचा अनुभव मिळेल. डार्क राईडच्या माध्यमातून शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना अनुभवता येतील. ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित प्रदर्शनांमुळे या संग्रहालयाला विशेष महत्त्व आहे.

संग्रहालय सफर
संग्रहालयाच्या प्रवेशदारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरलेली शस्त्रास्त्रे मांडण्यात आलेली आहे.तसेच शिवमुद्रेची प्रतिकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पूर्व महाराष्ट्र परिस्थितीची माहिती 13 डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हे दालन ऐतिहास‍िक काळाची अनुभूती देणारे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेली चढाई. यात त्यांच्या लढाऊ कौशल्य आणि रणनीती चा परिचय होईल. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेकाचे भव्य दालन महाराज यांनी स्थापन केलेल्या नौदलाचा इतिहास आणि खांदेरी येथील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती नावीव्यपुर्णरीत्या येथे मांडण्यात आलेली आहे. पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानावर शिवरायांनी केलेल्या धाडसी हल्ल्याची कथा या प्रदर्शनातून उत्साहवर्धक रीतीने उलगडेल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे