हैद्राबाद
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. कालच रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज चंद्रशेखर राव राहत्या घरात खाली कोसळले, यानंतर त्यांच्या पायाला आणि पाठीला जखम झाली आहे. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर हैद्रराबाद येथील राहण्यात घरात खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कदाचित अडखळल्यामुळे ते खाली पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ६९ वर्षीय चंद्रशेखर राव यांना फ्रॅक्चर झाल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. कदाचित त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थाळी लोकांच्या भेटी-गाठी करीत आहेत. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत केसीआर यांना ११९ पैकी केवळ ३९ जागांवर यश मिळवता आलं. येथे काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांनी काल (७ डिसेंबर) तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव रुग्णालयात दाखल, घरातच कोसळले
