Twitter : @therajkaran
मुंबई
आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे (BJP government) शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत, पण जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का? असा संतप्त प्रश्न विचारत शेतकऱ्यांचा उद्रेक (outburst of farmers) सरकारला परवडणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी दिला आहे.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे भाजपा सरकारवर तोफ डागतांना ते पुढे म्हणाले की, दुष्काळाने (drought) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसाने (unseasoned rain) शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान केले आहे. यावर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यातही भाजपा सरकार राजकारण करत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देऊन सरकारने त्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे. पण शेतकऱ्याला मदत कतानाच सरकार हात आखडता घेत आहे. भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी (anti farmers BJP government), निर्ढावलेले सरकार आहे, या सरकारला अधिवेशनात (winter session) जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस (Congress) पाठपुरावा करेल. शेतकऱ्यांनी मात्र कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पटोले यांनी केले आहे.