By Raju Zanke
जळगाव – हल्लीच्या धावत्या युगात अनेक स्त्री-पुरुष विविध कारणांमुळे कोणत्याही आधाराविना ‘एकल’ जीवन जगत आहेत. शिक्षण, आरोग्य, घर, रोजगार आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत गरजा भागविण्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने कोणताही निकष न लावता प्रतिमाह मानधन सुरू करावे, अशी मागणी एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी सांगितले की, या व्यक्तींसाठी ठिकठिकाणी सेवा प्रकल्प आणि आपुलकी सेवा केंद्रांची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट कंपन्या, समाजसेवी संस्था, देणगीदार, अभ्यासक यांनीही पुढे येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींच्या जीवनमान उंचावण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या संदर्भात सूचना अथवा सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी एकल-अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील (मो. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.