Sports ताज्या बातम्या

मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात हॅरिस शिल्डची जेतेपदासाठी झुंज

थरारक विजयासह पार केला उपांत्य फेरीचा अडथळा

मुंबई : शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. अंजुमन इस्लामने अल बरकतचे १४४ धावांचे जबरदस्त आव्हान २ विकेट राखून गाठले तर मॉडर्न इंग्लिश शाळेने १०३ धावांचा पाठलाग करणार्‍या ज्ञानदीप सेवा मंडळाचा ८० धावांतच खुर्दा पाडला आणि २३ धावांच्या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम सामना १६ ते १८ डिसेंबरला ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाईल.

हॅरिस शिल्डचे दोन्ही उपांत्य सामने चुरशीचे झाले. काल सामन्याच्या दुसर्‍या दिवशी जोरदार खेळ झाल्यामुळे सामना रंगतदार वळणावर पोहोचला होता. अल बरकत इंग्लिश शाळेने काल अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेपुढे १४४ धावांचे जबरदस्त आव्हान उभारले होते. कालच्या बिनबाद ६ वरून खेळ सुरू करणार्‍या अंजुमन इस्लामने शाहिद खानच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य ४० व्या षटकांतच गाठले आणि २ विकेट राखून जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. सामन्यात ९० धावांत ८ विकेट टिपणारा प्रभात पांडे सामनावीर ठरला. त्याने फलंदाजीतही चमक दाखवताना पहिल्या डावात ४३ धावा ठोकल्या होत्या.

दुसरा सामनाही कमालीचा झाला. मॉडर्नचे १०३ धावांचे आव्हान स्वीकारून दुसर्‍या दिवशी ८ बाद ७५ अशा नाजूक स्थितीत असलेल्या ज्ञानदीपचा संघ ८० धावांतच आटोपला. काल १९ धावांत ४ विकेट टिपणार्‍या दिक्षांत पाटीलने आजचे उर्वरित दोन्ही विकेट ५ धावांतच गारद केले आणि मॉडर्नला अंतिम फेरीत धडक मारून दिली. सामनावीर ठरलेल्या दिक्षांतने या सामन्यात ५२ धावांत १० विकेट गारद केले. दोन्ही सामन्यातील सामनावीरांना एसजी कंपनीच्या वतीने ३ हजार रुपये किमतीचे व्हाऊचर इनाम रुपात देण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
पहिला उपांत्य सामना
मॉडर्न इंग्लिश शाळा (प.डाव) : ३९.५ षटकांत सर्वबाद ११४; ज्ञानदीप सेवा मंडळ (प.डाव): ४० षटकांत सर्वबाद १२५
मॉडर्न (दु.डाव): ३५.३ षटकांत सर्वबाद ११४ (कणव सैनी ४१, झैद खान ६/३८, विराट यादव ३/५३); ज्ञानदीप (दु.डाव): ३५.५ षटकांत सर्वबाद ८० (दिक्षांत पाटील ६/२२, जसमीत सिंह २/२३, शशांक नाईक २/२१).
दुसरा उपांत्य सामना
अल बरकत इं. शाळा (प.डाव): ५८.२ षटकांत सर्वबाद २०२; अंजुमन इस्लाम इं. शाळा (प.डाव): ६०.३ षटकांत सर्वबाद १९१ (प्रभात पांडे ४३, अफझल शेख ३४, नितेश निशाद ४/५१, वली सय्यद ४/४०)
अल बरकत (दु.डाव): ३५.१ षटकांत सर्वबाद १३२ (आकाश मांगडे ४७, वेदांत बने ३५, प्रभात पांडे ५/३४, शेन रझा ३/४६); अंजुमन इस्लाम (दु.डाव): ३९.४ षटकांत ८ बाद १४४ (शाहिद खान ना. ४३, अरहान पटेल ३१; देवेन यादव ३/४७).

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज