आयजोल
मिझोराममध्ये जोरम पिपल्स मुव्हमेंटने आम आदमी पक्षासारखं घवघवीत यश मिळवलं आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सहाय्यकाची पहिली नोकरी करणारे माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा चर्चेत आहे. इंदिरा गांधींच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले लालदुहोमा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. पाच वर्षांपूर्वी 2018 मधील निवडमुकीत 8 पक्षांनी जेडीपीएमचं गठण केलं होतं.
तेव्हा लालदुहोमा यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पराभवासह दोन जागांनी विजय मिळवला होता. यात एक जागा त्यांनी सोडली होती, मात्र नंतर सत्तेत आलेले मिझो नॅशनल फ्रंटकडून विधानसभा अध्यक्षाला केलेल्या तक्रारीनंतर त्यांना आमदार म्हणून अयोग्य घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मात्र पोटनिवडणुकीत यश मिळवून ते विधानसभेत पोहोचले होते. जेडपीएमच्या यशाची आम आदमी पक्षाशी तुलना केली जात आहे.
स्वबळावर जिंकल्या 27 जागा
पूर्वेकडील या राज्यात तीन दशकानंतर नवा पक्ष जबाबदारी स्वीकारेल. जेडपीएमच्या वादळामुळे सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला केवळ 10 जागा जिंकता आल्या तर 22 वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ 1 जागा मिळवता आली. जोरम पिपल्स मुव्हमेंटने जोरदार पुनरागम करीत स्वबळावर बहुमत मिळवले आणि राज्याच्या 40 जागांपैकी 27 जागांवर विजय मिळवला. मिझो नॅशनल फ्रंट सत्तेच्या बाहेर गेल्यामागे भाजपशी जवळीकव कारणीभूत मानली जात आहे. राज्यात भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती.