मुंबई ताज्या बातम्या

मुंबईला धमकीमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का?

Vijay Wadettiwar speaking in the Maharashtra Legislative Assembly raising concerns over bomb threat emails targeting key locations in Mumbai during the budget session.

विधानसभेत Vijay Wadettiwar यांचा सरकारला सवाल

मुंबई –राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन, मेट्रो स्थानके, मुंबई उच्च न्यायालय आणि शेअर बाजारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना अशी धमकी मिळणे ही गंभीर बाब असून सरकारने याबाबत तातडीने निवेदन करावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ईमेलचा उगम शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, या धमकीचा ईमेल ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’कडून आल्याची चर्चा सुरू असली तरी त्यामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने या घटनेचा कोणत्याही बाह्य घटकांशी संबंध आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करणारी धमकी मिळाल्याने राज्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ईमेलचा उगम तातडीने शोधून काढून परिस्थितीबाबत सरकारने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या मुद्द्यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत सरकारकडून तत्काळ उत्तराची मागणी केली. या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. zoritoler imol

    March 12, 2026

    The core of your writing while appearing reasonable at first, did not work very well with me personally after some time. Somewhere throughout the sentences you managed to make me a believer but just for a short while. I still have got a problem with your jumps in assumptions and one would do well to fill in all those gaps. In the event you actually can accomplish that, I will certainly be impressed.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज