महाराष्ट्र

देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’…..!

राहुल गांधी यांची भाजपवर बोचरी टीका

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील असून, पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनुसार या देशात अदानी व मोदी हेच ‘ एक है तो सेफ है ‘ अशा शब्दांत जोरदार प्रहार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर केला.

पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे.धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका मोठ्या उद्योगपती देण्याचा खटाटोप यांनी सूरू केले आहेत असे सांगतानाच,
यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) सादर करून पत्रकारांसमोर ती उघडली. त्यात मोदी आणि अंबानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. हाच धागा पकडत अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोप ही तिजोरी दाखवत राहुल गांधी यांनी केला.

मुंबईतील हॉटेल सोफीटेलमधील भरगच्च पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विधानसभा निवणुकीतील मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मुंबईतील धारावी ही लघु व मध्यम उद्योगाचे हब आहे.हे हब बंद करुन धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.हा फक्त धारावीच्या जमिनीपुरताच मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधीत आहे.देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम,बंदरे, उर्जा निर्मीती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. भाजपाची नजर फक्तं मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत त्यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल,असेही गांधी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

निवडणुकीत महागाई व बेरोजगारी हे दोन मुख्य मुद्दे आहेत पण त्याकडे भाजपा सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूस, कांदा यासह शेतमालाला भाव नाही तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.परंतु भाजपा सरकार नोकर भरती करत नाही.मात्र मविआची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचे ३ लाखांचे कर्ज माफ करणार, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव,कांदा, कापसाला योग्य हमी भाव,महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये व मोफत बस प्रवासाची सुविधा,राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल.बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता तसेच २.५ लाख रिक्त सरकारी जागांची भरती केली जाईल.त्याचवेळी जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे यावर भर दिला जाईल असेही गांधी यांनी यावेळी ठामपणे बोलताना स्पष्ट केला.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की,काँग्रेसच्या ५ गॅरंटी व मविआच्या जाहिरनाम्यातील पुर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.कर्नाटक,हिमाचल प्रदेश, तेलंगणामध्ये काँग्रेसने अशाच गॅरंटी दिल्या होत्या त्याची यशस्वी अंमलबजाणी सुरु असल्याचेही गांधी यांनी यावेळी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल,महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला,राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत,उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे,मीडिया व पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा,मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा.वर्षा गायकवाड,प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,आदी उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात