X: @therajkaran
१६ मार्च रोजी स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या ६८ व्या सत्रात समांतर दृकश्राव्य प्रणालीवर ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI)चे पर्वात महिला समानतेसंदर्भात सायबरक्राईमचे आव्हान’ या कार्यशाळेचे आयोजन
पुणे दि.२५: आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत होत आहे. वस्तूच्या वितरण करण्यात देखील त्याचा उपयोग होत आहे. याचा सकारात्मकपणे योग्य वापर केल्यास लोकांना नक्कीच त्याची मदत होणार आहे. समाजातील बाल कामगार, कौटुंबिक हिंसाचार ग्रस्त, ऊसतोड कामगार, एकल महिला, दिव्यांग यांच्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) चा वापर होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. आगामी १६ मार्च २०२४ रोजी युएन च्या जागतिक महिला आयोगाच्या ६८ व्या सत्रात स्त्री आधार केंद्राच्यावतीने आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) च्या पर्वात स्रीसमानतेला सायबरक्राईमचे आव्हान
या वापरासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत जागतिक व राष्ट्रिय तज्ञांना निमंत्रित करणार आहे . त्याच्या तयारीसाठी फेब्रुवारीत मोहिम घेण्यात येणार आहे असे डॅा. नीलम गोर्हे यांनी सांगीतले .
आज गुरुवार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी स्त्री आधार केंद्राच्या वतीने “जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने चर्चा सत्राचे आयोजन” संदर्भात दृकश्राव्य बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती. जेहलम जोशी, यांसह संस्थेच्या सचिव अपर्णा पाठक यांसह अनिता शिंदे, सविता लांडगे, मीना इनामदार तसेच अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे सायबर क्राईम आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून होणारे गुन्हे याबाबत मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात स्त्रियांसमोर सायबर गुन्हेगारीचे सर्वात मोठे आव्हान आहे. यामध्ये प्रत्येक वेळी स्त्री रूपातील आकर्षक रोबो बनवून महिलेला गुलाम म्हणून समाजात मिरवणे अयोग्य आहे असे सांगितले. काही वेबसाईटवर डीप फेक च्या माध्यमातून सुप्रसिद्ध महिलांचे छायाचित्र वापरून त्यांच्याबाबत गैरकृत्य केल्याचे वारंवार समोर येत आहे. असे गैरकृत्य फक्त एक व्यक्ती करत नसून यापाठीमागे संघटित टोळ्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI)चा वापर या गैरकृत्य करण्यासाठी नसून त्याचा सकारात्मक वापर करण्यावर भर दिला पाहिजे. काही वेळेला यातील हॅकर्सचा पोलिसांना सदुपयोग देखील होत असतो. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याची मदत व्हावी अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
भारतीय घटनेनुसार स्त्रियांना अनेक अधिकार प्राप्त झाले आहेत. विशेषतः मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळाला आहे. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उद्याचा प्रजासत्ताक दिन हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केला आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. सर्वांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करावा अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी यांनी यावेळी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बद्दल माहिती दिली. यामध्ये आपण ज्या नैसर्गिक कृती करतो ते आजच्या जगात कंप्युटर करत आहे. यातून काही कामे सहज मार्गी लागणार आहेत. याचा फायदा आणि तोटा दोन्ही असल्याचे त्यांनी सांगितले.
Also Read: पालकमंत्री मुंबई शहराचे पण ध्वजवंदन करणार ठाण्यात…..!