ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेत विरोधी पक्षांनी घातला गोंधळ, संपूर्ण अधिवेशनासाठी 31 खासदार निलंबित

नवी दिल्ली

सोमवारी लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 34 विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं. निलंबित करण्यात (31 Lok Sabha MPs suspended for the entire session) आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुक खासदार टीआर बालू, दयानिधी मारन आणि तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या खासदारांपैकी 31 खासदारांना उर्वरित हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय अन्य तीन खासदारांना विशेषाधिकार समितीचा अहवाल प्रलंबित असल्याने निलंबित करण्यात आलं आहे. यापैकी के. जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांच्या नावाचा समावेश आहे. हे सर्वजण सभापतींच्या खुर्चीवर चढून घोषणाबाजी करत होते.

प्रल्हाद जोशींच्या निलंबनासंबंधात प्रस्ताव केला सादर
लोकसभा अध्यक्षांकडून नावाची घोषणा केल्यानंतर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशींच्या निलंबनासंबंधात एक प्रस्ताव सादर करण्यात आला. आवाजी मतदानाने त्यांची मंजूरी देण्यात आली. यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यापूर्वी गुरुवारी दोन्ही सभागृहातील १४ खासदारांना निलंबित केलं होतं. यात लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश होता.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात