महाराष्ट्र

भिडे गुरुजींच्या वकिलीवर शिष्याचा विश्वास  

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जरांगे-भिडे गुरुजी भेटीवरुन टिका

Twitter : @therajkaran

मुंबई :

भिडे गुरुजींनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी भेट घेऊन शिष्यांना सर्टिफिकेट दिले की, तुमची फसवणूक करणार नाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. पहिल्यांदा शिष्याने गुरुजीवर विश्वास ठेवला. आता गुरुजींनी वकीली करून शिष्यावर विश्वास ठेवायला सांगितलं आहे. हा सूर विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी जरांगे-भिडे गरुजी भेटीवर काढला. मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर बोलत होते.

दरम्यान, वडेट्टीवार असेही म्हणाले की, भिडे गुरुजींनी अजित पवार हे काळीज असलेला माणूस म्हणून त्यांनी सर्टिफिकेट देऊन ठेवलं आहे. म्हणजे भिडे गुरुजी आता सरकारचे सांगकाम्या म्हणून काम भिडे गुरुजी करतात का? हा प्रश्न लोकांच्या पुढे होता. आता त्यांना उत्तर मिळालं आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारमधील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली असल्याचे म्हटले.

सरकारची लूट सुरु आहे
कर्जाला शासकीय हमी देणे ही सरकारची लुट सुरु असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी खाजगीकरणावर टिका केली. या सरकारने खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून सरकारी मालमत्ता विका आणि आपलं घर चालवा असे सरकारचे धोरण आहे. सत्ता चालविण्यासाठी सरकारी पैसे वापरले जात आहेत. हे चालतं, मात्र विरोधकांनी असं केलं तर विरोध होतो. फडणवीसांनी कधीकाळी या गोष्टीला विरोध केला होता, मात्र आता ते यावर काहीच बोलताना दिसत नसल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात