महाराष्ट्र

महाड : लाखो मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाड

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड- पोलादपूर मधील ३९३ मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्सफूर्तपणे मतदान केले.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा आज विविध ठिकाणी पार पडला. आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. वयोवृद्ध नागरिकांनी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजेरी लावली. महाड तालुक्यामध्ये कींजलोळी दाभेकर कोंड येथील वयोवृद्ध नागरिकाचा मतदान करण्यासाठी येत असताना चक्कर येऊन मृत्यू झाला, ही घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचबरोबर सी.सी. टी. व्ही यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली होती.

महाड (Mahad) विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानासाठी नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अनंत गीते (Anant Gite) या दोघांमध्येच चुरस असल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांना आणण्यासाठी धावपळ सुरू होती. महाड तालुक्यामध्ये दुर्गम गावांमधून देखील वाहनांची सुविधा करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एसटी बसेस देखील मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजेपर्यंत विविध मतदान केंद्रांवर ४० ते ४५ टक्केच मतदान झाले होते. सकाळी अकरा वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढू लागली, यामुळे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर भर दुपारी शुकशुकाट जाणवत होता. मात्र चार वाजल्यानंतर पुन्हा मतदारांची मतदानासाठी धावपळ सुरू झाली.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात