ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मनोज जरांगेंच्या सभेला सत्ताधारी महायुती नेत्यांचा विरोध?

Twitter : @milindmane70

महाड

मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाडमधील छ. शिवाजी चौक येथे होणाऱ्या सभेला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे सकल मराठा समाजाच्या मीटिंगमध्ये दिसून आले. या बैठकीकडे महायुतीतील (Mahayuti) नेत्यांनी पाठ फिरवल्याने १९ नोव्हेंबरच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यभर दौरे सुरू केलेल्या मनोज जरांगे – पाटील यांची कोकणातील (Konkan) जाहीर सभा रविवारी दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज महाड तालुक्यातर्फे वीरेश्वर देवस्थान मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीकडे तालुक्यातील सत्ताधारी महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने सभेच्या यशस्वीतेबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha samaj) बैठकीला समाजाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे पदाधिकारी गैरहजर असल्याची चर्चा बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकण्यास मिळाली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुभाष निकम, सुभाष मोरे, चैतन्य मामुनकर, राजेंद्र कोरपे, संदीप सकपाळ, निलेश धुमाळ, विनोद देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नगरपरिषदेमधून तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेल्या मराठा समाजाच्या महायुतीमधील माजी पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने मराठा समाजाबद्दल व मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत त्यांची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत बैठक संपल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत या लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता असल्याचे दिसून आले.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात