महाराष्ट्र ताज्या बातम्या

ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्यांवरही कारवाईचा मार्ग मोकळा; सुधारणा विधेयक विधानसभेत संमत

महाराष्ट्र विधानसभेत गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर अश्लील नृत्यांवरील सुधारणा विधेयक मांडताना

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हॉटेल्स, उपाहारगृहे आणि बारमध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवरही पोलिसांना कारवाई करता यावी, यासाठीचे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले.

मुंबई : हॉटेल्स, उपहारगृहे आणि बारमध्ये महिलांच्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालणारे महत्त्वाचे सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झाले.

‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०२६’ हे विधेयक गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत मांडले. त्यानंतर पीठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी हे विधेयक संमत झाल्याचे घोषित केले.

यापूर्वी २०१६ मध्ये डान्स बारमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी मूळ विधेयक आणण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रत्यक्ष संगीत सादरीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या ऑर्केस्ट्रा परवान्याचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. संगीत सादरीकरणाच्या नावाखाली काही हॉटेल्स, उपहारगृहे आणि बारमध्ये अश्लील नृत्ये सादर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर आता संगीत सादरीकरणालाही म्हणजेच ऑर्केस्ट्रालाही या सुधारित अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील नृत्यांवर पोलिसांना थेट कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या विधेयकावर चर्चेदरम्यान अमित साटम, सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र आव्हाड, सुमित वानखेडे, संजय केळकर आदी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात