महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur Session : आंबा, संत्रा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजनेची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढ

नागपूर: राज्यातील आंबा, संत्रा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (RWBCIS) वेळेत सहभाग घेता न आल्याने, या योजनेची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली.

कृषीमंत्री भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेत सामील होता आले नाही. राज्य सरकारने या संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. या मागणीची दखल घेऊन केंद्राने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी अधिसूचित जिल्ह्यांमध्ये आंबा, संत्रा व काजू पिकांसाठी नोंदणीची मुदत वाढविण्यास मान्यता दिली आहे.

त्यांनी सांगितले की, कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही श्रेणीतील शेतकऱ्यांना वाढीव मुदतीत नोंदणी करण्याची संधी मिळणार असून, या कालावधीत होणाऱ्या नोंदणीसाठी भारत सरकारचा प्रीमियम वाटा पूर्वीप्रमाणेच लागू राहील.

वाढीव कालावधीत नैतिक जोखीम टाळण्यासाठी संचालन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पात्र शेतकरी या योजनेत सामील व्हावेत यासाठी राज्य सरकारने सर्व नोंदणी केंद्रांना व माध्यमांना ही माहिती तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश जारी केले आहेत, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.end

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात