महाराष्ट्र ताज्या बातम्या

विन्हेरे पंचायत समिती गणात शिंदे गटाला दणका!

उपसरपंच चंद्रकांत मोरे व पत्नी सुषमा मोरे यांचा शिवसेना (उबाठा)मध्ये प्रवेश

महाड  – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद गटातील विन्हेरे पंचायत समिती गणात शिवसेना शिंदे गटाला मोठा दणका बसला आहे. शिंदे गटाचे विन्हेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुषमा चंद्रकांत मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

महाड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत करंजाडी गटातून शिवसेना (उबाठा)च्या चिन्हावर निवडणूक लढवणारे, शिरगाव गावचे सरपंच तसेच दक्षिण रायगड जिल्हा उप-जिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सुषमा चंद्रकांत मोरे यांनी विन्हेरे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयामुळे विन्हेरे गणात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हा जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळ राऊळमहाड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे आणि ममता बुवा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे करंजाडी जिल्हा परिषद गटात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या मुहूर्तावर शिवसेना शिंदे गटाची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

चंद्रकांत मोरे व सुषमा मोरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, आगामी निवडणुकांत याचे प्रतिबिंब दिसून येईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात