मुंबई

एसटी चालवताना मोबाईल बंद

Twitter : @therajkaran

मुंबई :

राज्यताल एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असून एसटीची ख्याती कायम ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांना नियेजित ठिकाणी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाईल संदर्भात निर्णय घेतला आहे. एसटी चालवत असतांना मोबाईलवर बोलणे (mobile off) अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे किंवा बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन मंडळ (State Transport) प्रशासनाने दिले असल्याची माहिती एसटी महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचा दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव