महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘मृत्युंजय दूतांचा’ महामार्ग पोलिसांकडून सत्कार

Highway police honouring ‘Mrutyunjay Doot’ volunteers who rescue accident victims on the Mumbai–Goa Highway at Mahad, Raigad.

महाड  – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. अशा परिस्थितीत अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून जीव वाचविणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांचा महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते पोलादपूर या दरम्यानच्या महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना ‘मृत्युंजय दूत’ म्हणून गौरविण्यात आले. अपघात झाल्यानंतर जखमींना वाहनातून बाहेर काढणे, त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे तसेच रस्त्यावर झालेला वाहतुकीचा खोळंबा दूर करण्यासाठी ही मंडळी पोलिसांसह मदत करत असतात.

महाड येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या रायगड परिक्षेत्रात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुष्पलता दिघे (चव्हाण) आणि महामार्ग सुरक्षा पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांच्या हस्ते या ‘मृत्युंजय दूतांचा’ सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथील पोलीस चौकीत पार पडला.

या वेळी इंदापूर ते पोलादपूर तसेच कशेडी घाट परिसरात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित ‘मृत्युंजय दूतांनी’ आपल्या अनुभवांचेही कथन केले. तसेच अपघातग्रस्तांना मदत करताना वापरता येतील अशी आवश्यक साधने आणि किट यांचे वितरणही महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले.

मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अशा स्वयंसेवकांच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात