मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये भव्य कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्निवल दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहणार असून, खेळ, मनोरंजन आणि लोकप्रिय कलाकारांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
या कार्निवलमुळे वर्षाअखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लुटण्याची अनोखी संधी मिळणार असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व वयोगटांसाठी खास उपक्रम
सांताक्लॉज मॅस्कॉट, कार्टून मॅस्कॉट, टॅटू मॅस्कॉट, रोमिंग जगलर, रोमिंग वॉकर, मिकी माऊस बलून, ट्रॅम्पोलीन, ३६० अंश सेल्फी बूथ, स्टोरी पपेट शो (२५ ते ३० मिनिटे) आणि मॅजिक शो.
कलाकारांची मांदियाळी – ‘सेलिब्रिटी गप्पा’
- कविता लाड : २५ डिसेंबर | दु. ४ ते ६
- सुव्रत जोशी व सखी गोखले : २६ डिसेंबर | दु. ४ ते ६
- अदिती सारंगधर : २७ डिसेंबर | दु. ४ ते ६
- विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड : २८ डिसेंबर | दुपारी १२
- आनंद इंगळे : २९ डिसेंबर | दु. ४ ते ६
- डॉ. गिरीश ओक : ३० डिसेंबर | दु. ४ ते ६
- संजय मोने : ३१ डिसेंबर | दु. ४ ते ६
या सर्व कलाकारांसोबत गप्पांचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

