मुंबई
प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवार दि २२जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण राज्यभर प्रचंड उत्साह व आनंदमय वातावरणात होत आहे. राज्यातील सर्व रामभक्तांनी शहर तथा खेडोपाड्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तसेच सर्वच श्रीराम मंदिरांची तथा अन्य काही मंदिरांची रोषणाई करण्यात येणार आहे. अयोध्येतून प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी राज्यभरात राम भक्तांकडून विविध मंदिरामध्ये स्क्रीन लावण्यात येणार आहेत, तसेच शोभा यात्रांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
अशा जल्लोषपूर्ण कार्यक्रमांमध्ये वीज खंडित होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना करणे आवश्यक आहेत. बहुतांश ठिकाणी आठवड्यातून एकदा लोडशेडींग केले जाते आणि ते शक्यतो सोमवारीच असते. त्यामुळे अशा ठिकाणी विविध कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ शकतो. सदर विषय रत्नागिरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ रामभाऊ कुळकर्णी यांनी माझ्या निदर्शनास आणून देताव त्वरित त्या विषयीचे पत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पोहचलो व अवर सचिव राजेंद्र खंदारे यांची भेट घेतली, त्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला खंदारे
यांनी लोडशेडींग विषयाची त्वरित दखल घेऊन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, डायरेक्टर ऑपेरेशन यांच्याशी संपर्क साधला. सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राज्यात लोडशेडींग न करता अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्याच्या सूचना खंदारे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे अयोध्येतून थेट लाईव्ह प्रक्षेपण व अन्य धार्मिक कार्यक्रमात लोडशेडींगचा व्यत्यय येणार नाही.