महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचना कायम; रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५९ वरून ६६

महाड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) नवीन प्रभाग रचनेनुसार आणि २७% ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषदेची (Raigad Zilla Parishad) सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना व सदस्यसंख्या वाढविण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा आहे. यापूर्वी ओबीसी आरक्षणामुळे मे २०२१ पासून निवडणुका रखडल्या होत्या. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने नवीन प्रभाग रचनेचे आदेश काढले होते. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेबाबत दाखल याचिकाही न्यायालयाने आज फेटाळली.

रायगड जिल्हा परिषदेची नवी सदस्यसंख्या (६६):
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये पुढीलप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यसंख्या ठरली आहे –

  • पनवेल – ९, कर्जत – ६, खालापूर – ५, सुधागड – २, पेण – ६, उरण – ५, अलिबाग – ८, मुरुड – २, रोहा – ५, तळा – २, माणगाव – ५, महस्ळा – २, श्रीवर्धन – २, महाड – ५, पोलादपूर – २.

राज्यातील महापालिका (Municipal Corporation), नगरपालिका (Municipal Council) आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात