महाराष्ट्र ताज्या बातम्या

पनवेल मनपाची डॅशिंग नारी अमेरिकेत ठरली सर्वात भारी…

जागतिक स्पर्धेमध्ये शुभांगीला कांस्य पदक

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारी
शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. या यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले आहे.

अल्बामा, अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले हिने भारत देशाच्या संघात सहभागी होऊन 2025 च्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेत “ULTIMATE FIRE FIGHTING CHALLENGE” या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.

या स्पर्धेतील तिचा हा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. अल्बामा येथे 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा अग्निशमन, पोलिस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून 50 देश सहभागी झाले होते. शुभांगीने इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत, या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपला जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कांस्य पदक प्राप्त केले.

या दैदिप्यमान कामगिरीबद्दल अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले आहे.
चौकट….

“ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. माझ्या प्रशिक्षकांचे आणि कुटुंबीयांचे समर्थन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. यापुढेही मी अधिक मेहनत करू आणि भारताचे नाव उच्च ठरवण्याचे काम करीन.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात