मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, हे अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे. मात्र काही विरोधक सतत नकारात्मक विचार करत असल्याने त्यांना हे सत्य पचवणे कठीण जाते. अशा लोकांनीही आता सकारात्मक विचार करावा, अशी टिप्पणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी बुधवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गोयल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वामुळे देशाला अनेक वर्षे प्रगतीची वाटचाल करता यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गोयल म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात जितकी पायाभूत सुविधांची प्रगती झाली नव्हती, त्यापेक्षा अधिक वेगाने विकास पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झाला आहे. देशाला नवा आत्मविश्वास देत भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.
“पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उत्तुंग विकास झेप घेतली. महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर्स इतकी भूमिका बजावेल, याचा विश्वास वाटतो,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.
२०१४ पासून पंतप्रधान मोदींनी समाजातील सर्वात खालच्या स्तरातील घटक, मध्यमवर्गीय महिला, शेतकरी आणि आबालवृद्ध यांना सशक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. जीएसटी ०.२ मुळे जीवनोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून लोक स्वदेशी वापराकडे वळत आहेत, असेही ते म्हणाले.
“देशातील १४० कोटी जनता आज मनापासून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहे,” असे गोयल यांनी नमूद केले.
एका प्रश्नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की, अमेरिका हा भारताचा मित्रदेश आहे आणि दोन्ही देशांदरम्यान व्यापार धोरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
* * * A little gift, just because - grab it now: https://www.aakashmarble.com/index.php?m9b733 * * * hs=0c0c2f28109cce4187ed6cf7ec93395c* ххх*
September 17, 2025gsw1pw