मुंबई
वंचित बहुजन आघाडीचा मविआमध्ये समावेश होणार की नाही याबाबत अद्याप काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून कोणीच ठोस भूमिका मांडलेली नाही. सुप्रिया सुळे आणि जयंत पवार यांनी फॉर्म्यूला ठरला असून त्यावर शिक्कामोर्तब बाकी असल्याचं सांगितलंय.
यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मविआला १२+१२+१२+१२ चा सर्व पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला दिला होता. मात्र यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आणखी एक फॉर्म्युला दिला आहे.
काय आहे दुसरा फॉर्म्युला
शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युती झाली नाही तर, शिवसेना आणि वंचित २४-२४ जागा लढवतील. आता बॉल हा उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात आहे.