X : @therajkaran
मुंबई – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा (CM Ladaki Baheen Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे, आषाढी एकादशी 15 जुलै रोजी आहे. यासाठी पंधरा जुलैपर्यंत नोंदणीची अट रद्द करावी, सर्वांना ही योजना खुली असावी, अशी मागणी कॉंग्रेस सदस्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज विधानसभेत केली.
चव्हाण म्हणाले, अमरावती (Amravati), यवतमाळ (Yawatmal) आणि सोलापूर (Solapur) येथील केंद्रांवर दलालांकडून ७०० ते ८०० रुपये घेऊन महिलांची आर्थिक लूट (financial exploitation) केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. सोलापूर येथेही महिलांनी या योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली आहे, अशी माहिती चव्हाण यांनी सभागृहाला दिली.
ते म्हणाले, काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी (stampede) होईल, एवढी गर्दी आहे. उन्हात उभे राहिल्यामुळे महिलांना भोवळ येण्याच्याही घटना घडल्या आहेत. सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावोगावच्या पालख्या पंढरीच्या (Pandharpur wari) दिशेने जात आहेत. वारीत अर्ध्याहून अधिक महिला असतात. या महिला वारकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने दिलेली मुदत व्यवहार्य नाही. योजना फक्त निवडणुकीपुरती (election) आणायची आणि नंतर बंद करायची, हे योग्य नाही असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.