महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : कोणत्याही सरकार मधील कोणत्याही पक्षाचा मंत्री असो तो कधीच आपल्या एखाद्या विभागाची श्वेतपत्रिका काढा असे निर्देश म्हणा की आदेश अथवा सूचना प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना करीत नाहीत की देत नाहीत. कारण त्याने स्वपक्षाचे सरकार गोत्यातही येऊ शकते.पण सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मात्र चक्क एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले. मात्र त्यामुळे स्वपक्षाच्या आमदारांसहित ते विरोधकांच्या प्रशंसेचे ते खरे मानकरी ठरले. मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.

आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी या संदर्भात विस्तृत सूचना दिल्या.यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांचे सह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,सुमारे १० हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते.कर्मचाऱ्यांचे देणी,भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी या साठी महामंडळाला पैशाची गरज आहे. याबरोबरच महामंडळाला इंधन,वस्तु व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते? किती खर्च येतो? तसेच किती देणी बाकी आहेत.या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक असून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे,असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्ती मार्फत केली जाईल,तशा सूचना त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना देण्यात आल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली.

कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा व वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी “कॅशलेस मेडिक्लेम” योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी.असे निर्देश प्रशासनाला देतानाच,लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बसेस ज्या हॉटेल-मोटेल वर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा बाबत अनेक तक्रारी निर्माण होत असून या हॉटेल-मोटेलना परवानगी देत असताना यापुढे कडक धोरण स्वीकारले जाईल. ज्यामध्ये प्रवाशांच्या तक्रारी नुसार संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाई बरोबरच त्यांचा थांबा रद्द करण्याची देखील तरतूद असणार आहे.तसेच ज्या विभागात अशा हॉटेल-मोटेल संदर्भात तक्रार येतील त्या विभाग नियंत्रकांना देखील जबाबदार धरून त्यांच्यावर देखील प्रमादिय कारवाई करण्याची तरतूद या नव्या धोरणात असणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली.

एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा असून अशा तज्ञांना एसटी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले जावे अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी या बैठकीत दिल्या.त्यानुसार बांधकाम, वाहतूक, कामगार,आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रत्येकी एक अशा प्रकारे पाच तज्ञांची नियुक्ती लवकर महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात