मुंबई

श्री संत सेवालाल महाराज आणि कारंजा गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकासासाठी ₹८९३ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची मान्यता

मुंबई – वाशिम जिल्ह्यातील श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र आणि कारंजा गुरूमंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ₹८९३ कोटींच्या प्रकल्पांना उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी ₹७२३ कोटी आणि कारंजा गुरूमंदिर विकासासाठी ₹१७० कोटी यांना मंजुरी देण्यात आली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली तयार करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून राज्यभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास प्रभावीपणे करता येईल. प्रस्ताव सादर करताना त्या परिसरातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचेही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

या प्रकल्पांतर्गत होणारी विकासकामे:
• कारंजा गुरूमंदिर तिर्थक्षेत्रासाठी ₹१७० कोटींची विकासकामे
• श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी प्रकल्प १ आणि प्रकल्प २ अंतर्गत ₹७२३ कोटींची कामे
• नागपूर, नंदनवन ले-आऊटमधील लक्ष्मीनारायण व शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण व पुनर्विकास
• नागपूर, भांडेवाडी येथील श्री मुरलीधर मंदीर तिर्थक्षेत्राचा विकास
• नागपूर, शांतीनगर येथे इतवारी रेल्वे स्थानकाजवळील कुत्तेवाला आश्रमाचे सुशोभिकरण आणि विकास

प्रशासनाने कमीत कमी खर्चात उच्च दर्जाची कामे करण्यावर भर द्यावा, तसेच ग्रामविकास, पर्यटन आणि संबंधित विभागांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव