महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी महापालिकांना विखे पाटील यांचा इशारा; पाणी पुनर्वापर न केल्यास कारवाई

Maharashtra Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil speaking in the Assembly on excessive water usage and lack of recycling by Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations.

मुंबई: पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत असून पाणी पुनर्वापर (रिसायकलिंग) करत नसल्यामुळे कृषी क्षेत्रावर अन्याय होत आहे, असा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही महापालिकांना खणखणीत इशारा दिला.

“महापालिकांनी तातडीने आपल्या पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल,” असे स्पष्ट शब्दांत मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

हा मुद्दा आमदार राहुल कुल यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. पुणे जिल्ह्यात जलसिंचनामुळे चिबड जमिनींचे प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, बंदिस्त पाझरचर, बंधाऱ्यांचे स्वयंचलित बॅरेजमध्ये रूपांतर आणि तुळशी प्रकल्पाचे पाणी पूर्वेकडे वळवण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

“मुळशीचे पाणी भीमा खोऱ्यात कधी आणणार?” असा थेट सवाल कुल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आमदार विजय शिवतारे यांनी एका तालुक्याचे पाणी दुसऱ्या तालुक्यात वळवण्याच्या धोरणावर आक्षेप घेतला. “पुरंदरचे पाणी पुरंदरलाच मिळाले पाहिजे. चुकीच्या धोरणांमुळे फुरसुंगी सारख्या बागायती भागाचे वाळवंट होऊ देऊ नका,” अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.

उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,
“मुळशी धरणातून पाणी आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मोठ्या व्हर्टिकल बॅरेजेस उभारण्याची योजना आहे. चिबड जमिनींच्या प्रश्नावर पुढील एक-दोन महिन्यांत काम सुरू होईल. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात