महाराष्ट्र ताज्या बातम्या

रेशमा निवाळे बोरीवली भाजप मंडळाध्यक्षपदी नियुक्त

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय आणि समर्पित कार्यकर्त्या रेशमा निवाळे यांची बोरीवली विधानसभा क्षेत्राच्या भाजप मंडळाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद त्यांना लाभले असून, कार्यकर्त्यांमध्ये आणि शुभचिंतकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताच रेशमा निवाळे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी, भाजप आमदार संजय उपाध्याय, भाजप आमदार प्रविण दरेकर आणि माजी भाजप आमदार सुनील राणे यांची शिष्टाचार भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

रेशमा निवाळे यांनी सांगितले की, पक्षाने दिलेली ही जबाबदारी त्या पूर्ण निष्ठा आणि समर्पण भावनेने पार पाडतील आणि संघटनाला स्थानिक पातळीवर अधिक बळकट करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भाजपच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या संपूर्ण ताकदीनिशी करतील, असेही त्यांनी आश्वस्त केले.

या प्रसंगी पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. त्यांनी रेशमा निवाळे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना नवीन उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात