मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि मिती ग्रुप प्रस्तुत ‘साहित्य रंग’ ही लोकप्रिय साहित्यिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा १७ वा भाग येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मिती ग्रुप डिजीटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
या भागात प्रसिद्ध लेखक आशुतोष जावडेकर आणि कवयित्री पूजा भडांगे आपले साहित्यिक विचार, कविता व सर्जनशील रचना प्रेक्षकांसमोर सादर करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करतील.

‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचे आणि नव्या लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक भागात नव्या विचारांचा, विविध साहित्यिक शैलींचा अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळालेला आहे.
साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार असून, रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येणार आहे –
https://www.youtube.com/@mitigroupdigital8928