संतोष देशमुख आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्या प्रकरणांच्या चर्चे मध्ये अनेक समानता आढळतात, विशेषत: मीडिया ट्रायलच्या संदर्भात.
सुशांत सिंह यांच्या आत्महत्या/हत्या प्रकरणात जसे मीडिया ट्रायल सुरु झाले होते, तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुद्धा मीडिया ट्रायल सुरु आहे.
सुशांत सिंह यांच्याबाबत मीडियामध्ये झालेल्या चर्चेत कोणावरही ठोस आरोप ठेवले गेले नाहीत, मात्र काही रँडम व्यक्तींना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना अटक करण्यात आली होती. हेच चित्र संतोष देशमुख यांच्या हत्येत देखील दिसून येते, जिथे कोणावरही ठोस आरोप न ठेवता काही लोकांना अटक करण्यात आली आहे.
सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार चर्चेत आले, तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत आहे. मीडियाने सुशांत सिंह प्रकरणाची माहिती मोठ्या प्रमाणात कवर केली, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचेही असेच आहे.
सुशांत सिंह प्रकरणात अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत सारख्या व्यक्तींनी चर्चा सुरु ठेवली, तर संतोष देशमुख प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा आवाज येत आहे. हे दोन्ही प्रकरणे सामान्य नागरिकांच्या स्मृतीतून निघून जाऊ नयेत यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
सुशांत सिंह प्रकरणात अद्याप कोणावरही ठोस आरोप केले गेले नाहीत आणि संतोष देशमुख प्रकरणात देखील तेच भविष्य आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. राजकारणी या प्रकरणांची मीडिया ट्रायल करून नागरिकांची दिशाभूल करीत किंवा त्यांना संतोष देशमुख किंवा सुशांत सिंह यांच्यासारख्या व्यक्तींच्या हत्या/आत्महत्येच्या बातमीत गुंतवून ठेवून स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजत राहणार का? याबद्दल वाचकांचे काय मत आहे? संतोष देशमुख आणि सुशांत सिंह राजपूत यांना न्याय मिळेल का? कि राजकारणी अशा प्रकरणांचा मीडिया ट्राइल करीत नागरिकांना त्यामध्ये घुटमळत ठेवून स्वतःच्या स्वार्थाच्या पोळया भाजत राहणार?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी समाजाला जागरूक राहावे लागेल, कारण मीडिया ट्रायल आणि राजकारण्यांचा स्वार्थ हे दोन्ही विषय समाजाच्या न्यायाच्या आणि विकासाच्या दिशेला धक्का देऊ शकतात.
सचिन डांगळे
(सामाजिक कार्यकर्ता,मुंबई)