नंदी हिल्स :आजार साधा असो वा गंभीर — उपचार हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. समाजातील सर्व घटकांना आरोग्यसेवा मोफत मिळावी यासाठी सत्य साई संस्था देशभरात ‘नो बिलिंग काउंटर हॉस्पिटल’ उभारत आहे. म्हणजेच, तपासणीपासून ते औषधे आणि गंभीर शस्त्रक्रियांसह सर्व उपचार पूर्णतः नि:शुल्क असणारे मल्टिस्पेशालिटी रूग्णालय.
संस्थेचे कम्युनिकेशन विभागाचे सीईओ सुचेतन रेड्डी कोट्टा यांनी सांगितले की, सत्य साई संस्थेची महाराष्ट्रातील मुंबई आणि यवतमाळसह पाच राज्यांमध्ये आधीच नि:शुल्क रुग्णालये कार्यरत आहेत. आता कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली (बेंगळुरू जवळ) येथील सत्य साई गावात 600 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय बांधण्यात आले आहे. सर्व हॉस्पिटलप्रमाणेच येथेही एकही बिलिंग काउंटर नाही.
या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये — 11 शस्त्रक्रिया कक्ष, 400 सामान्य खाट, 100 आयसीयू खाट आणि 100 खाजगी खाट याशिवाय खालील विभागांची सुविधा उपलब्ध असेल: जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, नेत्रविज्ञान, श्वसनविकार, मनोरोग, त्वचारोग, हृदयरोग, दंतचिकित्सा, आपत्कालीन चिकित्सा, वेदनातज्ञ क्लिनिक, अॅनेस्थेशिया, अंत:स्रावी विकार, न्यूरोलॉजी, कार्डिओथोरेसिक व व्हॅस्क्युलर सर्जरी, डायलिसिस युनिट.
आधुनिक सुविधा:
सीटी स्कॅन, एमआरआय, प्रगत प्रयोगशाळा, आयसीयू आणि प्रशस्त प्रतीक्षालय — सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क.
23 नोव्हेंबर रोजी सत्य साईबाबा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले होते.
सुचेतन रेड्डी कोट्टा यांनी सांगितले की, खारघर (नवी मुंबई) येथील सत्य साई संजीवनी चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग सेंटर येथे जन्मजात हृदयरोग असलेल्या नवजात बालकांवर तसेच गर्भवती महिलांवर मोफत उपचार केले जातात.
तसेच यवतमाळ (वाघापूर रोड) येथील सत्य साई संजीवनी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल 2022 पासून कार्यरत असून येथेही मातृत्व आणि बालरुग्णांसाठी संपूर्ण नि:शुल्क उपचार उपलब्ध आहेत. याशिवाय दिल्ली/NCR मधील पलवल येथेही रुग्णालय चालते.
मोफत हृदयशस्त्रक्रियांची नवी क्रांती
दरवर्षी अंदाजे 2.5 लाख मुले जन्मजात हृदयरोग घेऊन जन्मतात. आतापर्यंत सत्य साई संस्थेने 37,000 नवजात बालकांची पूर्णपणे मोफत हृदयशस्त्रक्रिया केली आहे.
संस्थेच्या या उपक्रमामुळे देशातील गरीब, दुर्बल आणि वंचित घटकांना आधुनिक व अत्याधुनिक आरोग्यसेवा मोफत मिळत असल्याचे कोट्टा यांनी सांगितले.
थोडक्यात,
देशभरात ‘नो-बिलिंग’ हॉस्पिटल संकल्पना,
600 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय बेंगळुरूजवळ,
सर्व उपचार पूर्णतः नि:शुल्क,
PM मोदी करणार उद्घाटन — 23 नोव्हेंबर,
आतापर्यंत 37,000 मोफत हृदयशस्त्रक्रिया


免费资源下载
October 30, 2025真免费!价值万元资源,不要一分钱,网址:https://www.53278.xyz/